आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कराडमध्ये हत्याकांड: गोळी झाडून गुंडाचा खून; हल्लेखोराला ठेचून मारले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा- जिल्ह्यातील कराड शहरात साेमवारी टाेळीयुद्धाचा भडका उडाला. सकाळी नऊच्या सुमारास एकाने बबलू माने व त्याच्या अाईवर घरासमाेर येऊन गाेळ्या झाडल्या. याबाबत माहिती कळताच मानेच्या समर्थकांनी हल्लेखाेराला गाठून दगडाने ठेचून त्याची हत्या केली. दरम्यान, गाेळीबारात गंभीर जखमी झालेल्या मानेचा मृत्यू झाला, तर त्याची अाई अनसूया यांच्यावर उपचार सुरू अाहेत. या घटनेनंतर शहरात प्रचंड तणावाचे वातावरण असून पाेलिसांचा माेठा फाैजफाटा तैनात करण्यात अाला अाहे.

कराड शहरात व परिसरात गेल्या काही वर्षांपासून गुंडांच्या टाेळ्यांमध्ये वाद, हाणामाऱ्या हाेत अाहेत. विशेषत: ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक अाहे. नगरसेवक जयंत जाधव, पहिलवान संजय पाटील यांचे खून याच टोळीयुद्धाचा परिपाक होता. शहरातील मंडई परिसरात बबलू माने व बाबर खान यांच्या टोळीत वाद धुमसत हाेता, काही वेळा त्यांच्या समर्थकांमध्ये हाणामारीच्या घटनाही घडल्या. सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास बबलू माने हा मंडई येथील आपल्या घरासमोर बसला असताना दुसऱ्या गटाचा म्हाेरक्या बाबर खान याने त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. यात मानेच्या छातीत चार गाेळ्या लागल्याने ताे रक्ताच्या थाराेळ्यात पडला. त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणारी अाई अनसूया यांच्या हातापायांनाही गाेळी चाटून गेली. त्यात त्या जखमी झाल्या. या हल्ल्यानंतर क्षणार्धात बाबर खान पळून गेला.

दरम्यान, या हल्ल्याची माहिती कळताच मानेच्या समर्थकांनी त्याच्या घराजवळ गर्दी केली. यापैकी काहींनी मानेला रुग्णालयात दाखल केले, तर काही जणांनी शाेधाशाेध करून फरार बाबर खानला पकडून अाणले व गटारीजवळ पडलेल्या सिमेंटच्या पाइपने व दगडाने त्याला अक्षरश: ठेचून मारले. दरम्यान, इकडे, रुग्णालयात मानेचाही मृत्यू झाला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती.
मृत दाेघे कुख्यात गुंड
अचानक उद‌्भवलेल्या टाेळीयुद्धामुळे कराड शहरात सध्या तणावाचे वातावरण पसरले अाहे. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हा प्रकार या दोघांतील पूर्ववैमनस्याचा आहे. त्यामुळे प्रकरणाला उगाच जातीयवादाचा रंग न देण्याचे आवाहन देशमुख यांनी केले आहे. बबलू माने व बाबर खान हे दोघेही कुख्यात गुंड हाेते. मानेवर पोलिस ठाण्यात दहा तर बाबर खानवर सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
बातम्या आणखी आहेत...