आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जयसिंगपुर्‍यात गुंडाची गोळ्या घालून हत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - जयसिंगपूरमध्ये रविवारी दुपारी गोळ्या घालून भरत भाऊसाहेब त्यागी (वय 35) याचा खून करण्यात आला होता. भरत हा दोन खून प्रकरणांमध्ये आरोपी होता.

मूळचा कोल्हापुरातील बुधवार पेठेतील असणारा भरत काही वर्षांपूर्वी हातकणंगले तालुक्यातील यड्राव येथे राहण्यास आला होता. तेथे वर्चस्वाच्या वादातून एकाचा खून केल्याचा आरोप त्याच्यावर होता. तसेच इचलकरंजीतील शिवसेनेच्या एका पदाधिकार्‍याच्या खुनातही त्याचा हात असल्याचा संशय होता. रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास जयसिंगपूरमधील एका बारमधून तो बाहेर पडत असतानाच तवेरा गाडीतून आलेल्या आरोपींनी त्याच्यावर गोळय़ा झाडल्या. तो खाली पडल्यानंतरही चाकूचे वार करण्यात आले. यानंतर हल्लेखोर सांगलीच्या दिशेने पळून गेले.