आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर: दरवाजा उशिरा उघडला म्हणून मुलाने चाकूने भोसकून केला वडिलांचा खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- राजारामपुरी परिसरातील विक्रमनगर येथील शाहू कॉलनीत तरुणाने चाकूने भोसकून वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रफिक मुल्ला असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेली माहिती अशी की, रफिक दररोज रात्री उशिरा घरी येत होता. शनिवारीही तो 11 वाजता घरी आला. घराचे दार बंद होते. त्याने दरवाजा ठोठावला. पण वडिलांना दरवाजा उघडण्यास उशीर झाला. त्याचा राग आल्याने रफिकने वडील  पिरसाब मुल्ला (वय-55) यांच्यावर चाकूने वार केले. पिरसाब यांना तात्काळ छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी रफिक मुल्ला याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...