आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासरच्यांऐवजी दुसर्‍याच दाेघींचा खून, एक गंभीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - बहिणीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गेलेला भाऊ आणि त्याच्या दोन साथीदारांनी दुसर्‍याच घरातील दोन महिलांचा गळा चिरून खून केला. आणखी एक महिला गंभीर जखमी आहे. ही घटना रविवारी सांगली जिल्ह्यातील हिवरे या गावात घडली. या प्रकरणातील तिन्ही संशयितांना पोलिसांनी अटक केली.

खानापूर तालुक्यातील धोंडेवाडी येथील सुधीर घोरपडेची बहीण विद्या हिचा विवाह हिवरे येथील बळवंत शिंदेशी झाला होता. २००९ मध्ये विद्याने विष पिऊन आत्महत्या केली होती. त्या वेळी विद्याच्या आई-वडिलांनी तिच्या सासरच्या पाच व्यक्तींविरोधात घातपाताचा संशय व्यक्त करत गुन्हा दाखल केला होता. त्या खटल्याचा नुकताच निकाल लागला. यात विद्याच्या सासू-सासर्‍यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले. त्यामुळे बहिणीला न्याय मिळाला नाही, या भावनेने सुधीर अस्वस्थ होता.

सूडाच्या भावनेने त्याने बहिणीच्या सासरच्या सर्व मंडळींना संपवण्याचा चंग बांधला. रविवारी सकाळी त्याने मित्र रवींद्र कदम आणि अजय शिंदे यांच्या सहकार्याने हा निर्धार तडीस नेण्यासाठी हिवरे गाठले. सुधीरने पाच वर्षांपूर्वी बहिणीचे घर पाहिले होते. मात्र विद्याचे सासरे शेतातील घर सोडून गावात राहायला आले होते, याची सुधीरला कल्पना नव्हती. त्यामुळे तो साथीदारांसह विद्याच्या शेतातील घराजवळच्या ब्रह्मदेव शिंदे यांच्या घरात शिरला आणि ब्रह्मदेव यांची पत्नी प्रभावती, लग्न झालेली मुलगी सुनीता पाटील आणि सून निशिगंधा यांच्यावर चाकूने वार केले. यात प्रभावती आणि सुनीता यांचा जागीच मृत्यू झाला. निशिगंधा गंभीर जखमी असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर पसार झालेल्या सुधीरसह त्याच्या दोनही साथीदारांना पोलिसांनी तासगाव येथून अटक केली.
बातम्या आणखी आहेत...