आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीची वारंवार छेड काढल्याच्या रागातून कोल्हापुरात तरुणाचा चाकूने भोसकून खून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- पत्नीची वारंवार छेड काढणाऱ्या समीर बाबासो मुजावर ( वय-28, रा. सुभाष नगर)  या तरुणाचा आज (शनिवार) सकाळी 8 वाजता चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना घडली. आरोपी अनिल रघुनाथ धावडे (वय-38) याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर बाबासो मुजावर हा अनिल धावडे यांच्या पत्नीला त्रास देत होता. तिची भर रस्त्यावर छेड काढत होता. त्यामुळे अनिल याने त्याला वेळोवेळी ताकीत दिली होती. तरीही समीरच्या वागण्यात सुधारणा होत नसल्याने अनिल याने आपल्या बागलचौक येथील राहत्या घरी समीर याला बोलावून घेतले होते. त्याला समजावून सांगताना दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वादातूनच अनिल धावडे याने आपल्याकडील चाकूने समीरच्या पोटावर सपासप वार केले. यातच समीरचा मृत्यू झाला. नंतर अनिल स्वतः शाहूपुरी पोलिस ठाण्यात हजर झाला. शाहूपुरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली.

 

या घटनेमुळे बागल चौकसारख्या गजबजलेल्या परीसरात तणाव निर्माण झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...