आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅशनेबल कपडे घातल्याने भावाकडून बहिणीची हत्या; कोल्हापुरातील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऐश्वर्या आणि ओंकार - Divya Marathi
ऐश्वर्या आणि ओंकार
कोल्हापूर- तंग आणि फॅशनेबल कपडे घालण्याच्या कारणावरून भावाने केलेल्या बेदम मारहाणीत कोल्हापूरच्या ऐश्वर्या सुनील लाड या १७ वर्षीय युवतीचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा असलेला तिचा भाऊ ओंकार लाडच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ऐश्वर्या हिला फॅशनेबल कपडे घालण्याची आवड होती. मात्र, या कारणावरून ओंकारचे मित्र ऐश्वर्या व ओंकारला चिडवायचे. यामुळे रागावलेल्या ओंकारने काठीने आणि पडदे लावण्याच्या पाइपने सोमवारी रात्री ऐश्वर्याला बेदम मारहाण केली. पाइपचा वार डोक्याला लागल्याने ऐश्वर्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचार सुरू असताना तिचा रुग्णालयात मृत्यू झाला.