आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोक्यात दगड घालणा-या भावाकडूनच अंत्यसंस्कार, पोलिसांनी केले जेरबंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - त्याने आपल्या मोठ्या भावाचा निर्घृण खून केला. नंतर वृत्तपत्रातील बातम्या वाचून याबाबत बातमी कळाल्याचा आव आणून शासकीय रुग्णालय गाठले. पोलिसांचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व अंत्यसंस्कारही उरकले. कोल्हापुरातील एका 22 वर्षांच्या या युवकाची ही बनवेगिरी पोलिसांनी उघडकीस आणली असून त्याला जेरबंद करण्यात आले आहे.


राधानगरी तालुक्यातील ओढ्याच्या पात्रात 17 जूनला पोलिसांना युवकाचा मृतदेह सापडला होता. दगड घालून चेहरा विद्रूप केल्याने या खुनाचा कोल्हापुरातील खूनसत्राशी संबंध जोडला गेला. पोलिसांनी मृतदेह सीपीआर रुग्णालयात आणल्यानंतर मृत युवक योगेश महादेव माळी (रा. कोल्हापूर) असल्याची ओळख पटली. त्याचा धाकटा भाऊ महेश याने मृतदेह आपल्याच भावाचा असल्याचे सांगून ताब्यात घेतला व अंत्यसंस्कारही केले. पोलिसांनी तपास केला असता महेश यानेच खून केल्याचे उघडकीस आले. गवंडीकाम करणारा योगेश दारू पिऊन आईवडिलांना मारहाण करतो म्हणूनच महेश याने त्याला दारू पाजून ओढ्यावरून ढकलून दिले व नंतर डोक्यात दगड घालून ठार केल्याचे स्पष्ट झाले. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याने गुन्ह्याची कबूली दिली आहे.