आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Musical Instruments Manufacture Business Problem In Sangli

मिरजेतील सूरवाद्यांच्या व्यवसायाला हवीय ‘संजीवनी’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली- ‘सूरवाद्यां’च्यानिर्मितीचे देशातील महत्त्वाचे केंद्र असलेला मिरजेतील हा व्यवसाय विविध कारणांनी अडचणीत सापडला आहे. पश्चिम आणि दक्षिण भारतातील संगीतपरंपरा समृद्ध करणाऱ्या या केंद्राला नव्या सरकारकडून नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा आहे. सतार, तंबोरा, सारंगी अशी सूरवाद्ये निर्मितीची देशात मिरज, कोलकाता आणि लखनऊ ही तीन प्रमुख केंद्रे मानली जातात. याशिवाय अन्यत्रही सूरवाद्ये तयार केली जातात; पण या तीन ठिकाणी तयार होणाऱ्या सूरवाद्यांना जगभरातील आघाडीच्या गायक, वादकांनी पसंती दिली आहे. मिरजेत ही वाद्ये तयार करण्याची दीडशे वर्षांची परंपरा आहे. आजही येथे तयार होणाऱ्या सतार, तंबोरे जगभर निर्यात केले जातात. मात्र, अलीकडच्या काही वर्षांमध्ये संगीत परंपरा समृद्ध करणारा हा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. त्याकडे ना शासनाचे लक्ष आहे ना संगीताची परंपरा सांगणाऱ्या कलाकारांचे.
मिरजेच्या वाद्यांची वैशिष्ट्ये काय?
प्रशिक्षणाची वाणवा: सूरवाद्येतयार करण्याच्या व्यवसायाचे पुढील पिढीला शास्त्रशुद्ध शिक्षण देणारी व्यवस्था आपल्याकडे नाही. त्यामुळे नव्याने या व्यवसायाकडे फारसे कोणी येत नाही. वाद्यनिर्मिती करणारे जाणकार कारागीर आता वयोवृद्ध झाले आहेत. त्यांचा फायदा प्रशिक्षणासाठी करून घेणे शक्य आहे. त्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन अथवा कोणी पुढाकार घेतल्यास त्यांना प्रोत्साहन देऊन वाद्यनिर्मितीचे, संशोधनाचे आणि संगीताचे धडे देणारी संस्था येथे उभी राहण्याची गरज आहे.
उत्पादन घटले
काहीवर्षांमध्ये भीमा नदीकाठच्या भोपळ्यांचे उत्पादन घटले आहे. एका भोपळ्याला सरासरी तीनशे रुपये मिळतात. त्याचे एकरी उत्पादन कमी असल्याने शेतकरी ऊस उत्पादनाला प्राधान्य देतात. सध्या वर्षाला केवळ चारशे ते पाचशेेच भोपळे वाद्यनिर्मितीसाठी मिळतात. त्यामुळे मागणीनुसार वाद्यांचा पुरवठा करता येत नसल्याचे बाळासाहेब यांनी सांगितले. भोपळ्याला पर्याय शाेधण्याचा विचार वाद्यनिर्माते करत आहेत.
मात्र त्यासाठी संशोधन आणि प्रशिक्षण देणारी व्यवस्था आपल्याकडे नसल्याचे ते म्हणाले.
भाेपळ्यापासून सूरवाद्ये : लखनऊ,कोलकाता हीदेखील सूरवाद्ये निर्मितीची मुख्य केंद्रे असली तरी मिरजेच्या सूरवाद्यांना विशेषत: सतार आणि तंबोरा यांना गायक, वादकांची विशेष पसंती आहे. याचे कारण सांगताना मिरजेतील सतारमेकर बाळासाहेब मिरजकर म्हणाले, ‘ही दोन्ही वाद्ये तयार करण्यासाठी वापरला जाणारा भोपळा दर्जेदार असतो. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात भीमा नदीच्या काठावर काही मोजक्या गावांमध्ये या भोपळ्याचे पीक घेतले जाते. तेथील विशिष्ट हवामान, माती यामुळे हे भोपळे वजनाने हलके आणि बाहेरून टणक तयार होतात. त्यामुळे त्यातून मधुर सूर निर्माण होतो.’
आॅक्सफर्डकडून दखल : मिरजेच्यावाद्यनिर्मिती कलेची दखल आॅक्सफर्ड इनसायक्लोपीडियात घेतली आहे. बाळासाहेब मिरजकर आणि त्यांचा मुलगा मोहसीन या दोघांचा भारतीय शैलीच्या वाद्यनिर्मिती संदर्भकोशात करण्यात आला आहे.

संशोधनावरभर : मोहसीनहे वाद्यांमध्ये संशोधन करतात. गेल्या वर्षी त्यांनी सतारमध्ये संशोधन केले. सध्या ते महिलांनाही उपयुक्त ठरेल अशा तबल्याची निर्मिती करत आहेत. व्हायोलिन, गिटार आणि मेंडेलिनच्या निर्मितीवरही त्यांचा भर आहे.
शासनाच्या दुर्लक्षामुळे सुरेल व्यवसायात अनेक अडचणी, कारागिर अार्थिक विवंचनेत,

सूरवाद्यनिर्मिती व्यवसायापुढील आव्हाने
>भोपळ्यांचातुटवडा
>इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा पर्याय
>कुशल कारागिरांचा अभाव
>योग्य प्रशिक्षणाचा अभाव
>शासनाकडून दुर्लक्ष