Home »Maharashtra »Western Maharashtra »Kolhapur» Nangre Patils On Udayanraje

कुठेही पळा, अटक अटळ; विश्वास नांगरे- पाटील यांचा उदयनराजेंना इशारा

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 14:22 PM IST

कोल्हापूर/सातारा-कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील हे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबत आमने-सामने येण्याच्या तयारीत आहेत.
खा. उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यात झालेल्या राड्याप्रकरणी, नांगरे-पाटील यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात आणेवाडी टोलनाक्याच्या कंत्राटावरुन राडा झाला होता. याप्रकरणी पोलिसांकडून अटकसत्र सुरु आहे.
कुठेही पळा, अटक करणारच!
प्रत्येकाचा गुन्ह्यातील सहभाग पाहून कठोर कारवाई करु, मग तो कोणीही असो कायदा सर्वांना समान आहे, असे विश्वास नांगरे पाटील म्हणाले. इतकेच नाही तर या राड्यात सहभागी असणारे आरोपी पळून पळून कुठे पळतील?, कुठेही पळाले तरी त्यांना अटक करणारच, असा थेट इशारा नांगरे पाटील यांनी दिला. यावेळी नांगरे पाटील यांनी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांचे आणि सातारा पोलिसांचे कौतुक केलं. “घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिस दुपारपासून अलर्ट होते. एसपी संदीप पाटील हे वायरलेसवरुन सातत्याने पोलिसांच्या संपर्कात होते. पण मध्यरात्री असा प्रकार घडेल असा अंदाज नव्हता, पण तरीही पोलिसांनी परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली” असे नांगरे पाटील म्हणाले.
13 जणांना अटक, अनेक जण रुग्णालयात
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनीही थर्ड पार्टी म्हणून गुन्हा दाखल केला आहे. घटनेदिवशी फायरिंग झाले असून दोन पुंगळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे, तर या राड्यात अनेक जण जखमी झाले आहेत. ते गुपचूपपणे उपचार घेत आहे. मात्र पोलीस त्यांचा शोध घेऊन, त्यांना अटक करतील, असंही नांगरे पाटील यांनी सांगितले.
काय आहे आणेवाडी राडा प्रकरण?
आणेवाडी टोलनाक्यावरील वर्चस्व वादातून साताऱ्यातील दोन्ही राजे अर्थात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात गुरुवारी मध्यरात्री चांगलाच राडा झाला.
दोन्ही राजेंच्या समर्थकांमध्ये धुमश्चक्री होऊन, अनेक वाहनांची तोडफोड झाली. इतकंच नाही तर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुरुची बंगल्याजवळ गोळीबार झाल्यामुळे वाद चिघळला. खासदार उदयनराजे यांनी थेट शिवेंद्रराजे भोसलेंच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे आमदार शिवेंद्रराजे भोसले समर्थकांनी उदयनराजे समर्थकांच्या सात गाड्या फोडल्या.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

Next Article

Recommended