आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही टीका केल्यास तुम्हाला पळता भुई थोडी, नारायण राणे यांचे जयंत पाटलांवर टीकास्त्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - ‘सोनिया गांधींचे गाव विचारायची तुमची नैतिकता तरी आहे का?’, अशा शब्दांत उद्योगमंत्री नारायण राणे यांनीही गुरुवारी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ‘आम्ही टीका करायला लागलो तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल,’ असा इशाराही त्यांनी दिला.


सांगली महापालिका निवडणुकीतील काँग्रेसच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. जयंत पाटील यांनी प्रचारसभेत सोनिया गांधींचे गाव कोणते, असा सवाल केला होता. याचा समाचार घेताना राणे म्हणाले, ‘महापालिकेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर लढवली गेली पाहिजे. मात्र आमच्या मित्रपक्षातील लोक केवळ उणी-दुणी काढण्यातच धन्यता मानत आहेत. सोनिया गांधी भारतीय आहेत. त्यांच्या घराण्याने देशासाठी केलेले त्याग आठवले तर तुमच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होतील.


आर.आर. ही टार्गेट : ‘आमचे काही सहकारी साधुसंत बनू पाहतात. इथे मात्र पोलिसांवर हल्ला करणा-या गुन्हेगारांच्या मांडीला मांडी लावून बसतात. राज्यभर जातीयवादी पक्षांशी युती करतात, हे कोणत्या तत्त्वात बसते?’ असा टोला राणे यांनी आर. आर. पाटील यांना लगावला.