आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणेंच्या पक्षाचा झेंडा मनसेशी मिळताजुळता; महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची पहिली सभा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेल्हापूर- माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची पहिली सभा शुक्रवारी काेल्हापुरात झाली. श्री महालक्ष्मी देवीचे अाशीर्वाद घेऊन राणेंनी अापल्या नव्या पक्षाच्या झेंड्याचेही या सभेत अनावरण केले.  मनसेच्या झेंड्याप्रमाणेच स्वाभिमान पक्षाच्या झेंड्यावरही भगवा, निळा व हिरव्या रंगाचा समावेश अाहे. तसेच झेंड्याच्या मध्यभागी ‘वज्रमूठ’चे चिन्ह लावण्यात अाले अाहे. मुंबईतील परप्रांतीय फेरीवाल्यांविराेधातील अांदाेलनात मनसेच्या भूमिकेचे समर्थन करणाऱ्या राणेंची राज ठाकरेंच्या पक्षाशी वाढती जवळीक अाता या निमित्तानेही पुन्हा चर्चेचा विषय बनली अाहे. 


सभेपूर्वी शुक्रवारी दुपारी नारायण राणेंनी पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली. नाना पटाेले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताचा संदर्भ देऊन राणे म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंनी पटाेलेंकडून काहीतरी शिकायला हवे. पटत नसेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे. मात्र सत्तेत तीन वर्षे नाक घासत घासत काढल्यामुळे अाता उद्धव ठाकरेंना नाकच कुठे राहिले अाहे?’ असा टाेलाही लगावला. 

 

नितेशच आताच नुकसान का करु?- नारायण राणे

निवडणुका लागल्या की नितेश राणे माझ्या पक्षात येतील. मात्र आताच त्याच नुकसान का करू. नितेश 33 वर्षांचा आहे. सर्व आमदारांमध्ये पुढे आहे. त्यामुळे माझी दोन्ही मुल योग्य वेळी निर्णय घेतील, असे राणे यांनी स्‍वत:च्‍या पक्षातील पुत्रप्रवेशाबाबत स्‍पष्‍टीकरण दिले.

 

राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्‍याशी भेट

सकाळी 11.30 वाजताच कोल्हापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांनी नारायण राणे यांची ते उतरलेल्या हॉटेलमध्‍ये भेट घेतल्‍यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्‍या. मात्र धनंजय महाडिक यांनी ही सदिच्छा भेट असल्याचा निर्वाळा दिला आहे.


सहकुटूंब घेतले अंबाबाईचे दर्शन
कोल्‍हापूरात दाखल झाल्‍यानंतर राणे यांनी अंबाबाई मंदिरात देवीचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पुत्र माजी खासदार निलेश राणे, आमदारपुत्र नितेश राणे सुद्धा होते. देवीच्या दर्शनानंतर बिंदूचौकात जाऊन राणे यांनी महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. तसेच शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तेथून राजर्षी शाहू यांच्‍या जन्मस्थळाकडे जाऊन त्‍यांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली

 

वातावरण निर्मितीसाठी नितेश राणे 2 दिवसांपासून कोल्‍हापूरात
नारायण राणे यांच्या सभेची तयारी आणि कोल्हापूर येथे नारायण राणेंच्‍या वातावरण निर्मितीसाठी दस्तुरखुद्द काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या देखरेखीत गेल्या दोन दिवसांपासून कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

 

नारायण राणे हेच आमचे स्‍वाभिमान- नितेश राणे
'स्वाभिमान पक्ष नारायण राणेंचा आहे. आणि आम्ही रक्ताने स्वाभिमानी आहोत. त्यामुळे आम्हाला कोणाची कधी भीतीच वाटली नाही. काल (गुरुवार) विधानपरिषदेचे मतदान केल्यावरही मी मुंबईत काँग्रेस वाल्यांच्या नाकावर टिच्चून सांगून आलोय. नारायण राणे हेच आमचा स्वाभिमान आहे. यापुढे ते देतील त्या निर्णयाला शिरसावंद्य माणून राजकारणात काम करणार असल्याचे नितेश राणे यांनी 'दिव्य मराठी डॉट कॉम'शी बोलताना सांगितले.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, नितेश राणे यांनी दिव्‍य मराठीशी साधलेला संवाद आणि फोटोज...

बातम्या आणखी आहेत...