आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Narendra Dabholkar Was Great Human Being Says Gopinath Munde

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नरेंद्र दाभोलकरांची हत्‍या ही माणूसकीची हत्या-गोपीनाथ मुंडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा-‘डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या ही माणूसकीची हत्या आहे. राज्याच्या महान परंपरेला हे शोभणारे नाही. नामांतर चळवळीपासून माझा त्यांचा संबंध होता,’ अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी गुरूवारी रात्री दाभोलकर परिवाराचे सांत्वन केले. यावेळी मुक्ता दाभोलकर यांनी सरकार, राजकारणी या सर्व मंडळींनी आपल्या कृतीतून विवेकवादी, परिवर्तनवादी, धर्मचिकित्सा करणार्‍यांच्या पाठिशी उभ्या आहेत असे दाखवावे, असे आवाहन केले.

पत्रकारांशी बोलताना मुंडे म्हणाले की, डॉक्टरांचा वैज्ञानिक दृष्टीकोन होता. त्याला आमचा पाठिंबा आहे. मी गणपती दूध पित नाही असे स्पष्ट सांगितले होते. अंद्धश्रध्देच्या विरोधात आम्हीही आहोत, पण श्रद्धेबद्दल प्रश्न निर्माण होत असतील तर चर्चा व्हायला पाहिजे. डॉक्टरांनाही हा विचार मान्य होता. त्यामुळेच विचारांचा लढा विचारांनीच लढला पाहिजे, कोणत्याही संघटनेवर बंदी आणू नये. सरकारने डॉक्टरांच्या हत्येनंतर वटहूकूम काढला, पण बहूमताच्या जोरावर हा कायदा का मंजूर केला नाही? असा सवालही मुंडे यांनी विचारला.