आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Meeting News In Marathi, Divya Marathi, BJP, Prime Minister

सांगली, कोल्हापुरात नरेंद्र मोदींच्या सभा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सभा घेण्यासाठी स्थानिक महायुतीच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनीच ही माहिती दिली.
महायुतीने कोल्हापुरातून विद्यमान अपक्ष खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे पुत्र संजय मंडलिक यांना शिवसेनेत घेऊन उमेदवारी दिली आहे, तर सांगलीत राष्‍ट्रवादीचे माजी आमदार संजयकाका पाटील यांना भाजपमध्ये घेऊन रिंगणात उतरवले आहे. कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी शहरांमध्ये गुजराती, सिंधी, मारवाडी आणि परप्रांतीय मतदारांची संख्या मोठी आहे. महाराष्‍ट्रामध्येही मोदी समर्थक नागरिकांची संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मोदींच्या सांगली, कोल्हापूरमध्ये जाहीर सभा घेऊन वातावरण तयार करण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे.


पवारांना अद्दल घडवू : मंडलिक
शरद पवारांनी पराभवाचा वचपा काढण्यासाठीच काँग्रेसला नरेंद्र मोदींची भीती दाखवून कोल्हापूरची जागा राष्‍ट्रवादीच्या पदरात पाडून घेतली. परंतु गेल्यावेळच्या पराभवातून पवार काही शिकलेले दिसत नाहीत. मी गेल्या वेळी अपक्ष लढलो. आता तर आमच्यामागे शिवसेना, भाजप, स्वाभिमानी आणि रिपाइं कार्यकर्ते आहेत. त्यामुळे पवार यांना कायमची अद्दल घडवू, असा इशारा सदाशिव मंडलिक यांनी दिला आहे.