आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणेशाही हा देशाच्या विकासातील अडसर, नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - ‘तुमच्या भागात अनेक मोठमोठे लोक होऊन गेले आहेत. त्यामुळे मी हेलिकॉप्टरमधून येताना या भागाचे नंदनवन झाले असेल, असा विचार करत होतो; पण मी निराश झालो. एकाच घरातील चार चार पिढय़ांकडे सत्ता देऊन काय विकास झाला? ही घराणेशाहीच देशाच्या विकासातील प्रमुख अडसर आहे,’ अशी टीका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. सांगली, कोल्हापूर, हातकणंगले आणि कर्नाटकातील चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील रालोआच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सांगलीतील जाहीर सभेत ते बोलत होते.
राजू शेट्टींच्या शिट्टीला शरद पवारही घाबरतात
काँग्रेस सरकारने शेतकर्‍यांना देशोधडीला लावल्याचा आरोप मोदींनी केला. ‘या सरकारने साठ वर्षांत शेतकर्‍यांचे मोठे नुकसान केले आहे; मात्र आता हे थांबले पाहिजे. हे राजू शेट्टी एकटेच आंदोलनाची शिट्टी वाजवतात आणि स्वत:ला मराठय़ांचे सरदार म्हणवणारे शरद पवारदेखील हलतात. आता भाजपच्या शासन काळात आंदोलनाची वेळ येणार नाही.’
सांगली बनवूया चांगली!
भाषणाची सुरुवात मराठीतून केली. कृष्णाकाठी वसलेल्या सांगलीचे दैवत र्शी गणरायाला अभिवादन करतो, असे सांगून मोदी यांनी ‘सांगली बनवूया चांगली, हा माझा संकल्प असल्याचे सांगितले. ‘बडोद्यातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर मी पहिल्यांदा सांगलीच्या गणरायाचे आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेचे आशीर्वाद घ्यायला आलो आहे,’ असे भावनिक उद्गारही मोदींनी काढले.
ही निवडणूक जनतेचीच
‘राजकीय विश्लेषक टीव्हीवर गप्पा मारतात की या आघाडीला इतक्या जागा मिळतील, त्या आघाडीला तितक्या जागा मिळतील. या राजकीय पंडितांनी सांगलीत येऊन गर्दी बघावी. सगळे अंदाज हवेत उडून जातील. ही निवडणूक कागदी गणितांची राहिलीच नाही, ती लोकांच्या मनाच्या केमिस्ट्रीची बनली आहे. ही निवडणूक भ्रष्ट सरकारविरुद्ध देशातील जनताच लढवत आहे,’ असे मोदींनी स्पष्ट केले.