आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Narendra Modi Vs Cm Pruthviraj Chavan, News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींची वाटचाल हिटलरच्या दिशेने; मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- हिटलरहा लोकशाहीच्या मार्गानेच निवडून आला होता; परंतु नंतर त्याने काय केले हे जगाने पाहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तीन महिन्यांतील कार्यपद्धती पाहता त्यांची पावले हिटलरच्या दिशेने पडत असल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी काॅंग्रेस मेळाव्यात केली.

‘काँग्रेस सरकारच्या चांगल्या चाललेल्या योजना बंद पाडण्याचे सत्र मोदी सरकारने सुरू केले अाहे. चांगले चाललेले मोडायचे, सहकाऱ्यांवर पाळत ठेवायची, दहशत आणि एकाधिकारशाही निर्माण करायची ही मोदींच्या कामाची पद्धत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

‘मी दिल्लीत होतो. पंतप्रधान कसे निर्णय घेतात हे मला चांगले माहीत आहे. मनमाेहनसिंग सर्वांना सोबत घेऊन ते काम करत होते, परंतु मोदी सरकारच्या मंत्र्यांना स्वतंत्र बैठकाही घेण्याचे स्वातंत्र्य नाही. माेदींच्या अशा वागण्याचा जनताही आता पश्चात्ताप करत अाहे,’ असे सांगतानाच ‘आघाडी सरकारने केलेल्या कामाचे मूल्यमापन करून काँग्रेसला विजयी करा,’ असे चव्हाण म्हणाले.

सत्तेच्या सारीपाटात एकमेकांना धाेबीपछाड देण्याची एकही संधी साेडणाऱ्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या राजकीय पक्षांचे प्रमुख नेते मंगळवारी एका अाेळीने पूजेला बसले हाेतेे. मुंबई मेट्राेच्या तिसऱ्या टप्प्याच्या भूिमपूजन कार्यक्रमाच्या नििमत्ताने एेन निवडणुकीच्या ताेंडावर हा अनोखा याेग जुळून अाला.
२४ तासांत दोन राज्यपाल
केंद्रसरकारने महाराष्ट्राच्या राज्यपालांची बदली केली. मग त्यांनी राजीनामा दिला. म्हणून गुजरातच्या राज्यपालांकडे कार्यभार दिला. त्यांचा शपथविधी होऊन २४ तास उलटण्याआधी आता पुन्हा नवा राज्यपाल जाहीर करण्यात आला. ही कसली कामाची पद्धत,’ असा सवाल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींचे नाव घेता उपस्थित केला.