आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nationalist Congress Party News In Marathi, Congress, Vijaysinh Mohite

राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचा निर्णय 29 मार्चनंतरच घेऊ, काँग्रेसचे स्पष्‍टीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - गेल्या पाच वर्षांत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी कोणतेही काम केले नाही. केवळ बारामती आणि सोलापूरला पाणी विकण्याचे काम केले. त्यांनी आघाडी धर्मही पाळला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयसिंह मोहिते की, प्रतापसिंह हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 29 मार्चला ते स्पष्ट होईल. त्यानंतरच आम्ही राष्ट्रवादीला मदत करण्याचा निर्णय जाहीर करू, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चिमणराव कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिंदूराव नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, रणजितसिंह नाईक-निंबाळकर उपस्थित होते. कदम म्हणाले, ‘माढा लोकसभेसाठी विजयसिंह मोहिते आणि प्रतापसिंह मोहिते या दोघांनी अर्ज भरले आहेत. नक्की उमेदवार कोण आहे हे कळले पाहिजे. 29 मार्च हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतरच आम्ही भूमिका स्पष्ट करू.’


आभारही मानले नाहीत
कदम म्हणाले, ‘मागील निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादीला मदत केली. त्याबद्दल त्यांनी साधे आभारही मानले नाहीत. रामराजे निंबाळकर ज्या योजनांचे श्रेय घेतात त्या योजना माझ्या काळात आखल्या होत्या.’


मुख्यमंत्र्यांना त्रास होणार नाही
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे या निवडणुकीचे नेतृत्व करीत आहेत. त्यांना त्रास होईल, असे वर्तन आम्ही करणार नाही. त्यामुळे रणजितसिंह निंबाळकर यांनी बंडखोरी केलेली नाही. पण आम्ही निमूटपणे कोणालाही मदत करणार नाही. आमचा विकास करणार्‍या खासदाराला आम्ही मदत करू, असेही कदम यांनी सांगितले.