आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nationalist Mayor Expend Over Money ; Ignore Sir's Notice

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्‍ट्रवादीच्या महापौरांकडूनही उधळपट्टी ; साहेबांच्या सूचनांकडे दुर्लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कानपिचक्या देऊनही राष्ट्रवादीच्या नेत्यांना शाही लग्नसमारंभांवरील उधळपट्टी थांबण्याची सुबुद्धी आलेली नसल्याचे दिसते. दुष्काळग्रस्त सांगलीचे महापौर इद्रिस नायकवडी यांनी रविवारी मुलाच्या विवाह समारंभावर लाखो रुपयांची उधळण केली. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्याला गृहमंत्री आर. आर. पाटील आणि मदत व पुनर्वसन कार्यमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनीही हजेरी लावून पाहुणचार घेतला.

मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यमंत्री भास्करराव जाधव यांनी आपल्या मुलांच्या लग्नासाठी चिपळूणमध्ये कोट्यवधी रुपये खर्च केले. शाही पद्धतीने झालेल्या या विवाह सोहळ्यात झालेली उधळपट्टी पाहून पक्षाध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. तसेच लोकप्रतिनिधींनी खासगी कार्यक्रमात अशी उधळपट्टी न करता दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. त्यानंतर जाधव यांनी जाहीर माफी मागितली असली तरी इतर नेत्यांना मात्र पवारांचा हा संदेश अजूनही राष्‍ट्रवादीच्या नेत्यांना पटलेला दिसत नाही.

सांगली जिल्हा गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसतो आहे. पाण्यासाठी, जनावरांच्या चा-यासाठी सरकारदरबारी साकडे घातले जात आहे. मात्र याचे जराही भान न ठेवता शहराचे महापौर इद्रिस नायकवडी यांनी रविवारी सायंकाळी आपल्या मुलाचे लग्न शाही थाटात करून कोट्यवधींची उधळपट्टी केली. मिरजमधील महापालिकेच्या शाळेच्या प्रांगणात सुमारे 40 हजार लोकांच्या पंगती उठल्या. त्यासाठी रेल्वेने तब्बल 3 हजार किलो मटण मागवण्यात आले होते. मिनरल पाण्याच्या हजारो बाटल्याही मागवल्या होत्या.
पाहुणचार करणे कर्तव्यच
आमच्या कुटुंबात 20 वर्षांनंतर लग्नकार्य होत आहे. त्यानिमित्ताने आमचे विविध ठिकाणचे पाहुणे हजर राहिले होते. त्यांचा पाहुणचार करणे हे आमचे कर्तव्य होते. आम्ही केलेला सोहळा शाही स्वरुपाचा होता, असे मला वाटत नाही.’
इद्रिस नायकवडी, महापौर, सांगली