आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nationalist Morcha Resisted On Cooperative Minister Home

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहकारमंत्र्यांच्या घरावरील राष्ट्रवादीचा मोर्चा रोखला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरावर नेण्यात येणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा पोलिसांनी रोखला आणि मंत्र्यांना निवेदन देऊन आंदोलन समाप्त करण्यात आले. राष्ट्रवादीने हजारो कार्यकर्ते एकत्र आणून वातावरण निर्मिती करून दाखवली.

ऊस उद्योगासाठी जाहीर केलेले दोन हजार कोटी रुपये मेअखेरपर्यंत न मिळाल्यास घरावर मोर्चा आणू, असा इशारा माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी सहकारमंत्र्यांना दिला होता. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी बैठक घेत हा मोर्चा रोखण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. अशातही सकाळी ११ पासून येथील
निर्माण चौकात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमू लागले. तेथून एक किलोमीटरच्या अंतरावर मंत्र्यांच्या निवासस्थान परिसरातही भाजपचे कार्यकर्ते एकत्र झाले. पोलिसांनी सर्वच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना रोखून धरले.
सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देत झेंडे उंचावत कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. अखेर सहकारमंत्री पाटील यांना मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन दिले व आंदोलन संपवण्यात आले. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष राजू लाटकर, माजी आमदार के. पी. पाटील, निवेदिता माने, राजेंद्र पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.