आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nationalist Power Increases In Delhi, Therefore Not Tell Causes Bhaskar Jadhav

दिल्लीत राष्ट्रवादीची ताकद वाढवायची आहे,त्यासाठी कारण सांगू नका - भास्कर जाधव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - आपण केवळ मोठमोठी पदे मागतो आणि निवडणुकांमध्ये पक्षांचे उमेदवार निवडून आणताना मागे राहतो. दिल्लीत राष्ट्रवादीची ताकद वाढवायची आहे. त्यासाठी कोणतेही कारण सांगू नका, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी शुक्रवारी येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत दिला.
जाधव यांनी पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या विविध कार्यकारिणीवरील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांची हजेरी घेतली. शरद पवार यांच्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला सर्वाधिक कर्जमाफी मिळाली; तरीही या विभागात लोकसभेला राष्ट्रवादीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. आपला मित्रपक्ष आपल्या उमेदवारांना अडचणीत आणतो, ही एक बाजू असली तरी आघाडी सरकार म्हणून झालेल्या कामांचे मार्केटिंग करण्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कमी पडतात, असेही ते म्हणाले.
कोण हा राजू शेट्टी?
पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पराभवामागे काँग्रेसच असल्याचा आरोप अनेक कार्यकर्त्यांनी केला. हा भाग ऊस उत्पादकांचा आहे आणि राजू शेट्टी यांच्या ऊस आंदोलनाला काँग्रेसचे बळ असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी केला. याला उत्तर देताना भास्कर जाधव यांनी कोण हा राजू शेट्टी, कशाला त्याची भीती बाळगता, असा टोला हाणला.
‘आप’चे संघटन चांगले
स्थापना झाल्यापासून 13 महिन्यांत आम आदमी पक्षाने दिल्लीची सत्ता मिळवली. ती टिकेल की नाही, त्यांचा अजेंडा काय होता, यापेक्षा त्यांनी एवढ्या कमी कालावधीत संघटन बांधले आणि एका राज्याची सत्ता काबीज केली हे महत्त्वाचे आहे, असे भास्कर जाधव म्हणाले.