आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ताम्हिणी घाट, बघा सह्याद्रीच्या पर्वत रागांमधील नयनरम्य निसर्गाचे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सह्याद्रीच्या पर्वत रागांमध्ये पश्चिम घाटात नयनरम्य ताम्हिणी घाट आहे. पावसाळ्यात निसर्गसौंदर्य बघायचे असेल तर एकदा तरी ताम्हिणी घाटाला भेट द्यायलाच हवी. एखाद्या स्वप्नांच्या दुनियेत आलोय असे येथे आल्यावर वाटते. आपण अगदी हुरळून जातो. मन चिंब चिंब भिजते. ढगांवर जाऊन बसते. हिरवेगार मखमली गालीचे, धुसर काळे पर्वतांवर विसावलेले ढग, खळखळ वाहणारे धबधबे लक्ष वेधून घेतात.
पाऊस सुरु झाला की येथील लहान-मोठे धबधबे आणि पाण्याचे प्रवाह प्रवाही होतात. टेकड्या अगदी नववधूसारख्या सजतात. काळा रुक्ष टेकड्या कात टाकतात. हिरव्या शाली पांघरतात. मुळशी धरणाचा विस्तारही येथे दिसतो. वर्षा सहलीसाठी हे ठिकाण अगदी योग्य आहे. त्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी जमते.
कसे जाता येईल- पुण्याच्या पौड रस्त्यापासून अंतर 93 किलोमीटर. मुंबईपासून अंतर 140 किलोमीटर. मुंबईकडून येताना अॅम्बि हॅली रस्त्याने ताम्हिणी घाटाकडे जायला फाटा फुटतो.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, निसर्गसौंदर्याने फुललेल्या ताम्हिणी घाटाचे एकापेक्षा एक सरस फोटो....
फोटो सौजन्य- फेसबुक
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...