आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्‍यांमध्‍ये फ्री स्‍टाइल; डीवायएसपीसह चार पोलिस जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली – जिल्‍ह्यातील तासगाव येथे कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती निवडणुकीवरून आज (शनिवार) भारतीय जनता पक्षा आणि राष्‍ट्वादी कॉंग्रेसच्‍या कार्यकर्त्‍यांमध्‍ये तुफान हाणामारी झाली. दरम्‍यान, यामध्‍ये कार्यकर्त्‍यांसह बंदोबस्‍ताकरिता आलेले पोलिस उपअधीक्षक आणि चार पोलिस कर्मचारी जखमी झाले. शहरात तणावपुर्ण शांतता असुन जलद कृती दलाच्या तुकड्या शहरात तैनात करण्यात आल्या आहेत.
तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान होते. मात्र, जुन्‍या राजकीय वादातून भाजपचे संजय पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेगचे अनिल पाटील यांच्‍या गटात वाद झाला. दरम्‍यान, दुपारी तीन वाजताच्या सुमारास हमाल गटातील एका मतदारासोबत राष्ट्रवादीचे नेते तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यश्र दिनकर पाटील आणि माजी नगरसेवक श्रीनिवास पाटील मतदान केंद्राकडे निघाले होते. यावेळी तेथे थांबलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी या दोघांवर हल्ला केला. दिनकर पाटील यांना जबर मारहाण केली. त्यांना वाचवण्यासाठी पोलिस उपाधीक्ष क कृष्णा पिंगळे मध्‍ये पडले. त्यांनाही कार्यकर्त्यांनी मारहाण केली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांवरही दगडफेक केली. यामध्ये काही कार्यकर्ते जखमी झाले. या घटनेनंतर तासगाव शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रवादीच्या मोजक्या कार्यकर्त्यांना शहराबाहेर पिटाळून लावले आहे.