आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- गेल्या तीन वर्षांपासून सत्तेवर असलेले भाजप-शिवसेना सरकार सर्वच पातळीवर सपशेल अपयशी ठरले आहे.पोकळ आश्वासन देऊन जनतेची फसवणूक करणाऱ्या या सरकारबद्दल तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.राज्य सरकारच्या या अनागोंदी आणि जनविरोधी कारभाराचा निषेध नोंदवण्यासाठी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल आंदोलन केले.या आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री आणि विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.


शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जबाजारी राज्य,विजेच्या समस्या, महागाई, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, रस्त्यांच्या समस्या, उद्योग रोजगारात झालेली घसरण, नागरी भागातील समस्या,आश्वासनांची पूर्तता, शिष्यवृत्ती चे प्रश्न, आरोग्य व्यवस्था, ढासळलेली शिक्षण व्यवस्था या अशा सर्व प्रश्नांबाबत हा मोर्चा काढण्यात आला.


जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार आपल्या कार्यालयात उपस्थित नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी अरविंद  लाटकर यांनी स्वीकारले.
आपल्या निवेदनाच्या निमित्ताने  राष्ट्रवादी कॉंग्रेसने,निवेदनात समाविष्ट बाबींवर धडक कृती करण्याची अपेक्षा व्यक्त करून महाराष्ट्र देशातील सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकाचे राज्य राहण्यासाठी प्रसंगी टोकाचा संघर्ष करून सामोरे जाऊ असा इशारा राज्य सरकारला देण्यात आला आहे.


आजच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, खासदार धनंजय महाडिक, महापौर हसीना फरास, आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार के.पी.पाटील, आर. के. पोवार, शहराध्यक्ष राजेंद्र लाटकर आदींसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि व्हिडिओ

बातम्या आणखी आहेत...