- Marathi News
- NCP Leader Ajit Pawar\'s Comment On Trupti Malvi
ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लाचखोर महापौरांची गय केली जाणार नाही, अजित पवारांची कोल्हापुरात स्पष्टोक्ती
कोल्हापूर- राष्ट्रवादी पक्षात भ्रष्टाचाराला थारा नसल्याचे सांगत कोल्हापूरच्या लाचखोर महापौर तृप्ती माळवी यांची गय केली जाणार नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांनी सोमवारी राष्ट्रवादींच्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
दरम्यान, कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांना 30 जानेवारीला 16 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी ही कारवाई केली होती.
तृप्ती माळवी सध्या रुग्णालयात आहेत. त्यांना डिस्जार्ज मिळेल त्या क्षणी अटक करण्यात येईल असेल पोलिसांनी सांगितले आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, अटक टाळण्यासाठी तृप्ती माळवी यांची धडपड सुरु...