आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • NCP Minister\'s Brother Arrested On Charges Of Rape

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘राष्ट्रवादी’ मंत्र्याचा भाऊ बलात्कारप्रकरणी अटकेत; \'...तर भावाशी संबंध तोडेल\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे यांचा थोरला भाऊ ऋषिकांत शिंदे याला सातारा पोलिसांनी बलात्कार प्रकरणात सोमवारी अटक केली. न्यायालयाने त्याची 21 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.
दरम्यान, या प्रकारामुळे जलसंपदा मंत्र्यावर टीकेची झोड उठली असून ही घटना सत्य असेल तर मी भावाशी संबंध तोडून टाकीन, असा पवित्र शशिकांत शिंदे यांनी घेतला आहे.
ऋषिकांत (51) जमिनी व घर खरेदी-विक्रीचे व्यवहार करतो. मुंबई येथील एका महिलेच्या आईच्या घराची विक्रीही तो करणार होता. यासाठी संबंधित महिलेला त्याने रविवारी रात्री आठच्या सुमारास व्यवहाराची बोलणी करण्यासाठी येतो, असे फोनवर सांगितले होते. मात्र ‘माझे पती घरी नाहीत’ असे सांगून सदर महिलेने त्याला भेटण्याचे टाळले. तरीही ऋषिकांत ‘आपण थोडक्यात बोलणी करू’ असे सांगून बळजबरीने घरी गेला.

पुढील स्लाइडमध्ये, पोलिसांनी दिले पुरावे