आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारमध्ये सावळा गोंधळ, मुख्यमंत्री फक्त भाषण देत सुटलेत- सुप्रिया सुळे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली- सत्तेत येण्यापूर्वी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा अशी विचारणा भाजप करीत होती. आता त्यांचे सरकार आल्यावर दुष्काळात नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, अशी सांगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी मु्ख्यमंत्र्यांवर केली आहे. भाजप सरकारच्या काळात सगळीकडेच फक्त सावळा गोंधळच बघायला मिळत आहे असेही सुप्रिया म्हणाल्या.
सांगलीतल्या एका कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला आहे. पण या सरकारला त्याचे काहीही देणे-घेणे नाही. भाजपमध्येच नुसताच सावळा गोंधळ सरकार कोणतेही ठोस काम करताना दिसत नाही. मुख्यमंत्री फक्त मोठमोठाली भाषण ठोकतात. त्यांची कृती मात्र शून्य आहे, अशी टीका करीत सुप्रिया सुळेंनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.