आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Near The Kolhapur One And Half Crore's Gold Stolen From Travells

कोल्हापूर जवळ ट्रॅव्हल्समधून दीड कोटीचे सोने लंपास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - बंगळुरूहून आणण्यात येत असलेले दीड कोटी रुपयांचे सोने लंपास झाल्याची तक्रार गोकुळ शिरगाव पोलिस स्थानकात दाखल झाली आहे.बंगळुरूहून शर्मा ट्रॅव्हल्सच्या बसमधून अशोक धावडे व अमित शहा (रा. मुंबई) हे सोने घेऊन मुंबईला येत होते. कोल्हापूरजवळ विकासवाडी येथील हॉटेल महाराजा येथे बस थांबली असता या दोघांकडे असलेली सोन्याची बॅग लंपास झाल्याचे लक्षात आले. बॅगेत 4 किलो सोन्याची बिस्किटे, 11 नेकलेस, सोने बिस्किटाचे 51 तुकडे व रोख 1 लाख 83 हजार रुपये असा 1 कोटी 45 लाखांचा माल लंपास झाल्याचे त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. हे सोने मुंबईतील एका ज्वेलर्सचे होते.

याच ठिकाणी 3 वेळा चोरी
याच ठिकाणाहून गेल्यावर्षी एप्रिलमध्ये दीड कोटीचे हिरे असलेली बॅग लंपास करण्यात आली होती. तसेच सहा महिन्यांपूर्वीच बसमधूनच दोन लॅपटॉप व महत्त्वाची कागदपत्रे लंपास झाल्याची घटना घडली होती. याआधीच्या चोरीच्या घटनांचा सुगावा अद्याप लागलेला नाही. त्यातच ही घटना घडल्याने त्याचे गूढ वाढले असून पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे ठाकले आहे. दीड कोटीचे सोने असलेली बॅग बसमध्ये ठेवून कोण खाली उतरेल काय, हाच महत्त्वाचा प्रश्न आहे.