आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर. आर. कौरवांचे प्रवक्ते : गोर्‍हे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - ‘ज्यांच्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत असे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील हे कौरवांचे प्रवक्ते आहेत,’ अशा शब्दांत शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोर्‍हे यांनी मंगळवारी हल्लाबोल केला. महायुतीचे येथील उमेदवार संजय मंडलिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

गोर्‍हे म्हणाल्या की, ‘गृहमंत्री निव्वळ बोलण्याचे काम करतात. गुन्हेगारांची चामडी सोलून काढतो म्हणणार्‍या पाटील यांना यातील काहीही शक्य झालेले नाही. उलट मुख्यमंत्र्यांनीच त्यांचे अधिकार काढून घेतल्याने केवळ बोलण्यापेक्षा अधिक त्यांच्याकडून काही होऊ शकत नाही.’ मंडलिक म्हणाले की, ‘आर. आर. कोल्हापुरात आले होते, तेव्हा त्यांच्यासोबतच गुंडगिरी करणारेच लोक होते.’