आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेळगाव : संकेश्वरमध्ये सापडली ११ अर्भके

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेळगाव - बेळगावमधील संकेश्वर येथे ११ अर्भके सापडल्याने खळबळ उडाली आहे. संकेश्वर येथील हिरण्यकेशी नदीपात्रात ही अर्भके सापडली. याची माहिती मिळाल्यानंतर बेळगावचे पालिस आणि डॉक्टरांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात घडलेल्या स्त्रीभ्रूण हत्येच्या प्रकाराने महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावी लागली. त्यानंतर आता बेळगावमधील प्रकारही संतापजनक आहे. अशी प्रतिक्रीया स्थानिकांतून व्यक्त होत आहे. संकेश्वर येथील हिरण्यकेशी नदीच्या पात्रात ही अर्भके सापडली. त्यांना डॉक्टरांच्या पथकाने बेळगावच्या रुग्णालयात हलविले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ही अर्भके टाकली असण्याची शक्यता आहे. अजून त्यांची तपासणी होणे बाकी आहे. त्यानंतरच त्याबद्दल बोलणे योग्य होईल, असेही ते म्हणाले. ही अर्भके स्त्री जातीची आहेत की पुरुष याची देखील अद्याप माहिती मिळालेली नाही.