आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिलेला ब्लॅकमेल केले; सहायक फाैजदार अटकेत, सात जणांचा अाराेपीत समावेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - पुण्यातील एका महिलेला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार संजय लोंढे (रा. मिरज) व हवालदार बाबुमियां काझी (मूळ गाव नाझरे ता. सांगोला जि. सोलापूर) यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली.
पुण्यातील जमिनीचे व्यवहार करणारे गिरीश मधुकर गायकवाड यांच्याबाबत हुपरीच्या काही चांदी व्यावसायिकांना माहिती मिळाली हाेती. गायकवाड यांच्याकडे बक्कळ पैसे असून त्याला धमकी देऊन पैसे काढता येतील अशी माहिती या व्यापाऱ्यांनी लोंढे यांना दिली. त्यानुसार गायकवाड मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये गेले असता तिथे जावून अाराेपींनी गायकवाड यांच्याकडे पाच काेटी रुपयांची मागणी केली. त्या वेळी त्यांनी लोंढे याला सहा लाख रुपये व २२ हजारांचा मोबाइल हंॅडसेट घेऊन दिला.
दरम्यान, गायकवाड यांच्यासाेबत या वेळी पुण्यातील एक महिलाही असल्याचे सांगितले जाते. त्या दाेघांतील संबंधाचा गैरफायदा घेऊन लाेंढे व इतर अाराेपींनी या दाेघांकडून ३१ लाख ५० हजार रुपये उकळले. नंतर गायकवाड हे संबंधि महिलेसह गोव्याकडे जाणार असल्याची माहितीही लाेंढे यांना समजली. त्यांच्यासह इतर अाराेपींनी या दाेघांना कागलजवळ अडवून पुन्हा पैशांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यामुळे दाेघांनाही कोल्हापुरातील एका हाॅटेलवर डांबून ठेवले.
या वेळी संबंधित महिलेने ७ लाख रुपये दिले व आणखी १८ लाख रुपये त्याच दिवशी अाराेपींच्या बंॅक खात्यात जमा केले. मात्र अाराेपींची पैशाची हाव वाढतच गेली. ते अाणखी पैशासाठी गायकवाड व संबंधित महिलेला धमक्या देऊ लागले. अखेर संबंधित महिलेने थेट पोलिस महासंचालकांकडे तक्रार दिली. त्यानुसार कोल्हापूरचे पाेलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी चाैकशी करुन याप्रकरणातील सात अाराेपींना गुरुवारी सायंकाळी अटक केली. यात लाेंढेंसह अन्य एका हवालदारासह हुपरी येथील चांदी व्यापाऱ्यांचाही समावेश अाहे.

पुन्हा बदनामी
लैंगिक शोषणापासून ते पैसे उकळण्यापर्यंत अनेक तक्रारी दाखल झाल्यामुळे कोल्हापूर पोलिसांच्या अब्रुचे अनेकवेळा धिंडवडे निघाले आहेत. आता यात पुन्हा या प्रकरणाची भर पडली आहे. येथील एका पोलिस निरीक्षकालाच एका हाॅटेलच्या खोलीतून टाॅवेलवर बाहेर पडतानाच्या क्लिप चार वर्षांपूर्वी बाहेर आल्या होत्या, त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...