आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण, खेळ, शिक्षणावरही देशाइतके प्रेम करणारा कर्नल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील मनिगाह जंगलात अतिरेक्यांशी मुकाबला करताना शहीद झालेले साताऱ्याजवळील पोगरवाडीचे भूमिपुत्र कर्नल संतोष महाडिक एक कर्तव्यनिष्ठ, निडर लष्करी अधिकारी म्हणून ओळखले जात. पर्यावरणावरही देशाएवढेच प्रेम करणारा, लहान मुलांमध्ये रमणारा, आपल्या मित्र-आप्तेष्टांना आवर्जून कुपवाड्यात बोलावणारा उमदा अधिकारी आमच्या गावाने गमावल्याची भावना त्याच्या पोगरवाडीतील मित्रांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.
महाडिक शहीद झाल्याची बातमी मंगळवारी धडकली अन‌् या गावावर शाेककळा पसरली. त्यांच्या घराकडे जाणाऱ्यांची रीघ वाढत असून प्रत्येकाच्या डाेळ्यात पाणी हाेते. साताऱ्यातील प्रा. संध्या चौगुले यांचे बंधू हवाई दलात फायटर पायलट अाहेत. ते अाणि महाडिक वर्गमित्र. ‘महाडिक यांना लहानपणापासूनच लष्करात जाण्याची जिद्द हाेती. सातारा येथील सैनिकी शाळेत शिक्षण त्यांनी याच उद्देशाने घेतले. बारावीनंतर हुशारी व जिद्दीच्या जाेरावर त्यांनी एनडीएमध्ये प्रवेश मिळवला. महाडिक यांच्या अाठवणी सांगताना प्रा.चौगुले म्हणाल्या, ‘जून महिन्यात अाम्ही कुपवाडा येथे गेलाे हाेताे. महाडिक यांच्या पत्नी स्वाती या माझ्या विद्यार्थिनी. महाडिक यांनी तेथील कष्टकरी वर्गाच्या मुलांना शिक्षणासाठी प्राेत्साहन दिले. स्वातीनेही त्यांना मदत केली. जिथे जिथे वृक्षताेड दिसली तिथे महाडिक यांनी वृक्षलागवडीची माेहीम राबवली. सामान्य नागरिकांशी त्यांचे प्रेमाचे संबंध हाेते,’ अशी अाठवण सांगताना चाैगुलेंना भावना अनावर झाल्या.
दाेन्ही घराण्यांचे नाव उज्ज्वल केले...
महाडिक यांचे मूळ नाव संतोष मधुकर घोरपडे. त्यांना दोन भाऊ आणि एक बहीण. वडिलांचे साताऱ्यात टेलरचे दुकान. बंधू अजित दुधाचा तसेच टेलरिंगचा व्यवसाय. संताेष हे मावशीकडे दत्तक गेले हाेते. त्यामुळे त्यांचे अाडनाव महाडिक झाले. ‘संताेषने दाेन्ही घराण्यांची नावे उज्ज्वल केली,’ अशा भावना आरे येथील एकनाथ पाटील यांनी व्यक्त केल्या. ‘माझा भाऊ जे ठरवायचा ते करूनच दाखवायचा. त्याला देशाचे रक्षण करायचे हाेते. त्याने ते केलेही,’ असे अजित सांगताे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, धोनीलाही देले होते. प्रशिक्षण...