आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहीद कर्नल संतोषवर साताऱ्यात अंत्यसंस्कार, महिलांनी लावले नाही कुंकू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा- काश्मिरातअतिरेक्यांशी लढताना शहीद झालेले कर्नल संतोष महाडिक यांचे पार्थिव पोगरवाडी गावात पोहोचल्यानंतर गावकऱ्यांनी रस्त्यांवर रांगोळी काढून अभिवादन केले. त्यांची जागोजागी पोस्टर्स होती. त्यांच्या हौतात्म्याच्या सन्मानार्थ गावातील महिलांनी कुंकूही लावले नाही. आदल्या रात्री कुणाचीही चूल पेटली नाही. संरक्षणमंत्री पर्रीकरांनी कर्नलच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. ‘मी माझ्या दोन्ही मुलांना सैन्यातच पाठवीन,’ असे कर्नलच्या पत्नी स्वाती म्हणाल्या. त्यांची कन्या कार्तिकी ९, तर पुत्र स्वराज वर्षांचा आहे.