आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"संतोष असता तर जास्त आनंद वाटला असता!', महाडिक कुटुंबीयांच्या भावना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा- ‘सातारा जिल्ह्यातील पाेगरवाडीचे भूमिपुत्र शहीद कर्नल संतोष महाडिक यांना केंद्र सरकारने मरणाेत्तर शौर्यचक्र जाहीर केले अाहे. या घटनेचा कुुटुंबीयांना आनंद वाटावा का, हा आमच्यापुढे प्रश्न आहे. कारण जर संताेष अाज अामच्यात असता तर या सन्मानाचा अाम्हाला कितीतरी पटीने अधिक अानंद वाटला असता. मात्र, मरणाेत्तर हा शब्द अस्वस्थ करून जाताे,’ अशी भावना संताेष यांचे बंधू जयवंत घोरपडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली.

‘संताेषने देशासाठी जे बलिदान दिले त्याचा आम्हाला अभिमानच आहे. सन्मान मिळाला म्हणून चेहऱ्यावर हसू असले तरी त्याच्या नसण्याने डोळ्यात आसू आहेत,’ असे त्यांनी सांगितले. ‘संताेषच्या पराक्रमाची दखल सरकारने घेतली, त्यांचा सन्मान केला. आम्ही दु:खी अंत:करणाने सन्मान स्वीकारणे संतोषला आवडणार नाही. म्हणून याप्रसंगी आम्हाला सन्मान स्वीकारण्याचे बळ परमेश्वरानेच द्यावे,’ ही अपेक्षा त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.

१७ नोव्हेंबर रोजी कुपवाडाच्या जंगलात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत संताेष शहीद झाले होते. त्यांच्या या कामगिरीचा सन्मान म्हणून साेमवारी त्यांना मरणाेत्तर शाैर्यचक्र जाहीर करण्यात अाले. ही बातमी कळताच गावातील विद्यार्थ्यांनी मशालफेरी काढली. तसेच ग्रामस्थांनी संताेष यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.