आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदी मानवाप्रमाणे अंगभर केस असलेल्या दोन बहिणींच्‍या आयुष्‍यात आला आनंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली- जन्मत:च शरीरभर केस... बरं, मुलीची जात... समाज स्वीकारणार कसा?.. जगाच्या पाठीवर असलेल्या अशा सहा व्यक्तींपैकी तिघी बहिणी सांगलीच्या... मात्र, या तीनपैकी दाेन बहिणींच्या लग्नाचे स्वप्न नुकतेच पूर्ण झाले आहे.  या दोघींना समाजाने स्वीकारल्यामुळे अजूनही चांगुलपणा शिल्लक आहे, हेच अधोरेखित झाले.   

तासगाव तालुक्यातील कवठे एकंद  गावातील संभाजी राऊत यांना जन्मजात चेहऱ्यापासून पायाच्या नखापर्यंत केस. पुरुष असल्याने त्यांच्या या व्यंगाची चर्चा फारशी झाली नाही; मात्र त्यांच्या सहा मुलींपैकी तिघींनाही वडिलांप्रमाणेच अंगभर केस अाहेत.  त्यांनी अनेक त्वचारोगतज्ज्ञांकडून उपचार करून घेतले,  पण ते तात्कालिक ठरले.   राऊत भगिनींच्या व्यंगाची चर्चा जगभर झाली. डिस्कव्हरी वाहिनीने त्यांच्यावर माहितीपट तयार केला. त्या वेळी या तिघींसह जगाच्या पाठीवर अशा सहा व्यक्ती असल्याचे उजेडात आले. रशियातील एका संशोधन संस्थेने संशोधन करण्यासाठी दोघी भगिनींना रशियाला बोलावले. जपानमधील संशोधन संस्थेनेही बोलावले.  यालाही आता पाच वर्षे उलटली; मात्र, अद्याप उपचार निघाल्याचे कळलेले नाही. दरम्यानच्या काळात २००७ मध्ये संभाजी यांचे निधन झाले. पत्नी अनिता यांनी मोठ्या धीराने तिघींना मोठे केले. सविता, मनीषा या दहावीपर्यंत शिकल्या. तिसरी सावित्री बारावी झाली. एकाने तिला बंगळुरू येथे नोकरीही मिळवून दिली; पण पगार फारसा मिळत नसल्याने ती गावी परतली. नंतर अनिता राऊत यांनी त्यांचे लग्न करायचे ठरवले. आपल्या मुलींचे व्यंग विचित्र असल्याने त्यांचे लग्न होणार कसे, हा प्रश्न होताच. आपल्याशी कोण लग्न करणार, हा या मुलींनाही प्रश्न होताच; पण पै-पाहुण्यांच्या मदतीने यापैकी दाेन मुलींची कार्ये झाली.  

- २०११ मध्ये सविताचा विवाह कोल्हापूर जिल्ह्यातील सेनापती कापशी येथील दिलीप कारंडे या तरुणाशी ठरला. दिलीप हा अंध; तरीही त्याने गावात स्वत:ची बेकरी चालवली आहे. गेली चार वर्षे सविताचा संसार सुखात सुरू आहे.   
- या वर्षी २७ मे रोजी मनीषाचा विवाह सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील विठ्ठल पालसांडे या तरुणाशी झाला. विठ्ठल हादेखील अंशत: अंध आहे; पण त्यानेही मोठ्या मनाने मनीषाचा स्वीकार केला. या दोघींचे विवाह समाजात आजही चांगुलपणा शिल्लक असल्याचीच साक्ष देतात.

पिढीलाही धोका  
राऊत भगिनींमध्ये आलेले हे व्यंग अानुवंशिक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्याच्यावर लेसर उपचार आहेत; मात्र ते महागडे असल्याने ते परवडणारे नाहीत. त्यांच्या पुढच्या पिढीमध्येही हे व्यंग येऊ शकते. सविताला २०१२ मध्ये मुलगीच झाली आणि तिलाही सविताप्रमाणेच अंगभर केस आहेत. यावर ठोस उपचार निघत नाही तोपर्यंत हा सिलसिला पिढ्यान््पिढ्या सुरूच राहील, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
 
पुढील स्‍लासइड्सवर पाहा संबंधित फोटो....
बातम्या आणखी आहेत...