आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काॅ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणः समीरच्या जामिनावर २८ ला निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - काॅ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील एकमेव साक्षीदार असलेल्या शाळकरी मुलाने क्लासला गेल्यानंतर त्याच्या शिक्षिका, आणखी एक विद्यार्थी आणि घरात आई आणि आजी यांना खून प्रकरणाबाबत माहिती दिली हाेती. या अप्रत्यक्ष साक्षीदारांची तपासणी करण्यासाठी अवधी देण्याची मागणी सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी साेमवारी काेल्हापूरच्या न्यायालयात केली. ती मान्य करण्यात अाली. त्यामुळे अाता या प्रकरणातील प्रमुख संशयित समीर गायकवाड याच्या जामीन अर्जावर २८ जानेवारी रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे.
‘समीरची मानसिकता हिंसक आहे, सनातनचे तत्त्वज्ञानही त्याच पद्धतीचे आहे. त्याच्या संभाषणाची चाचणी, दोन डुबक्यांची भाषा, फरार संशयित रुद्र पाटील याच्याशी असलेले संबंध या सर्व बाबींचा विचार करता त्याला जामीन मिळाल्यास तो रुद्रप्रमाणेच फरार होण्याची शक्यता अाहे,’ असा युक्तिवाद अॅड.निंबाळकर यांनी केला.