आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर: कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना डंपरमधून पुरवण्यात येत होते गांजा अन् मोबाईल!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाच तो कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात गांजा आणि मोबाईल फोनसह बॅटरी घेऊन जाणारा डंपर - Divya Marathi
हाच तो कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात गांजा आणि मोबाईल फोनसह बॅटरी घेऊन जाणारा डंपर
कोल्हापूर- कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना डंपर मधून गांजा आणि मोबाईल पुरवण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलीसांनी डंपर चालकास ताब्यात घेतले आसून त्याची चौकशी करण्यात येत आहे.  

याविषयी अधिक माहिती अशी की, कळंबा कारागृहात येथील एका खासगी ट्रस्टच्या वतीने कैद्यांसाठी शेड बांधकाम करून देण्याचे काम सुरू आहे. या जागेत मोठा खड्डा आल्याने तो बुजवून सपाटीकरणासाठी त्याजागी मुरूम टाकण्याचे काम सुरू होते. या कामासाठी लक्ष्मण धनगर (वय ३२ रा. वाशी, ता. करवीर) हा चालक डंपर घेऊन आल होता. कारागृह पोलिसांनी संशयावरून डंपरची झडती घेतली असता चालकाच्या सीट खाली रिकाम्या जागेत चार नवीन मोबाईल, तीन मोबाईल बॅटरी आणि चक्क 230 ग्रॅम गांजा आढळून आला. या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चालकाची चौकशी केली तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले आहे.

यापूर्वीही कळंबा कारागृहात अनेक वेळा असे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे कारागृह प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. सतर्क यंत्रणेमुळेच कैद्यांपर्यंत या वस्तू पोहचण्या आधीच पोलीसांनी हस्तगत केल्या आहेत. मोबाईल फोन आणि गांजा यासारखे नशेचे पदार्थ कोणी पाठवले आणि कोणत्या कैद्यांना देण्यात येणार होते हे अद्याप उघड झाले नाही.
बातम्या आणखी आहेत...