आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबाबाई मंदिरातील पुजारी हे सरकारी नोकर, उत्पन्न घेण्याचा अधिकार नाही शाहू महाराजांनी काढला होता वटहुकूम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - करवीर निवासीनी अंबाबाई मंदिरातील पुजारी हे सरकारी नोकर आहेत, त्यांना तेथील उत्पन्न घेण्याचा अधिकार नाही, अशा आशयाचा वटहुकूम करवीरनगरीचे तत्कालिन छत्रपती शाहू महाराज यांनी १४ मे १९१३ ला जारी केला होता. या वटहुकूमाच्या आधारे सध्याचे पुजारी हे पंढरपुरातील पुजाऱ्यांप्रमाणे सरकारी नोकर मानले जावेत, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल करणार असल्याची माहिती धर्मतत्वज्ञानाचे अभ्यासक पत्रकार सुभाष देसाई, आणि सामाजिक कार्यकर्ते शरद तांबट तसेच शिल्पकार अशोक सुतार यांनी कोल्हापूरात पत्रकार परिषेदेमध्ये ही माहिती दिली.

यावेळी चारवेळा भंगलेल्या मंदिरातील मूर्ती बदलण्याचा मु्द्दा देखील उपस्थित करण्यात आला. जून्या मूर्तीऐवजी तंत्रशुद्ध बनवलेली मूर्ती मोफत देण्याची तयारी शिल्पकार सुतार यांनी दर्शवली.शाहू महाराजांच्या वटहुकूमाचा संदर्भ देऊन देसाई म्हणाले, या मंदिरात जमा होणारी देणगी, रक्कमेचा विनियोग हा भक्तांसाठी धर्मशाळा, पाण्याची व्यवस्था, तसेच शैक्षणिक कामासाठी केला जावा, असे म्हटले होते. एवढेच नाही तर मंदिरात जमा होणाऱ्या देणगीपैकी १० रुपयेपर्यंतची रक्कम पुजाऱ्यांनी घ्यावी व उर्वरित दागिने, शालू सरकारला जमा करावे, असे म्हटले होते.
बातम्या आणखी आहेत...