आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना लुटण्यासाठी व्यापाऱ्यांना खुला परवाना-विखे यांचा सरकारवर अाराेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - ‘शेतकऱ्यांकडील सर्व तूर खरेदी करण्याचा शब्द सरकारने दिला होता. परंतु, शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल तूर पडून असताना खरेदी बंद करणे, हा शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे. सरकारने शासकीय खरेदी बंद करून व्यापाऱ्यांकडे कवडीमोल भावाने तूर विक्री करण्यास शेतकऱ्यांना भाग पाडले. तूर खरेदी बंद करणे म्हणजे व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांच्या लुटीसाठी खुला परवाना देण्यासारखेच अाहे,’ अशी टीका विधान सभेतील विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी केली.
 
शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी  काँग्रेस- राष्ट्रवादीसह राज्यातील विराेधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला काेल्हापुरातून सुरुवात झाली. राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळाला वंदन करून व श्री महालक्ष्मीला साकडे घालून या अांदाेलनाला प्रारंभ झाला. त्यानंतर अायाेजित पत्रकार परिषदेत विखे बाेलत हाेते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, संघर्ष यात्रेचे समन्वयक सुनील केदार अादी नेत्यांची प्रमुख उपस्थिती हाेती. भाजपचे मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचाही विखे पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला. ‘नाफेडचे अधिकारी आणि व्यापाऱ्यांमध्ये संगनमत असल्याच्या अाराेप राजू शेट्टी करतात. मात्र, त्यांनी अाता हे आरोप करण्याचे धंदे बंद करावेत. ते आता सरकारमध्ये सहभागी आहेत. त्यामुळे अधिकारी व व्यापाऱ्यांचे संगनमत असल्याची माहिती त्यांच्याकडे असेल तर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू करावी. उद्धव ठाकरेंप्रमाणेच राजू शेट्टीसुद्धा सत्तेचे सर्व लाभ उपभोगून सरकारवर टीका करण्याचा ढोंगीपणा करत आहेत. उद्धव ठाकरे म्हणजे ‘बडे मियाँ’ आणि शेट्टी म्हणजे ‘छोटे मियाँ’ असल्याची खरमरीत टीका त्यांनी केली.  
बातम्या आणखी आहेत...