आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एनआयएचे पथक कोल्हापुरात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेतील संशयित समीर गायकवाडच्या चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पथक रविवारी कोल्हापुरात दाखल झाले. दरम्यान, कर्नाटकातील विवेकवादी कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी धागेदोरे शोधण्याच्या तपासासाठी कर्नाटक पोलिसांचेही पथक आले आहे.

गायकवाडच्या पोलिस कोठडीचे चार दिवस संपले असून, तीन दिवसांत पोलिसांना माहिती काढायची आहे. गोव्यात २००९ मध्ये झालेल्या स्फोटात ‘सनातन’चे दोघे ठार झाले होते. रूद्र पाटील तेव्हापासून फरार आहे. जत तालुक्यातील रूद्र एनआयएच्या वाँटेडच्या यादीत आहे. समीरच्या अटकेची माहिती मिळाल्याने एनआयएचे पथक आले होते. समीरला ठेवलेल्या पोलिस मुख्यालयात येण्याऐवजी बाहेरच जिल्हा पोलिस प्रमुखांकडून पथकाने माहिती घेतली.

एक लाख सह्यांचे मोदी यांना निवेदन
पानसरे यांच्या हत्येला ७ महिने झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक लाख सह्यांचे निवेदन पाठवण्याची मोहीम रविवारपासून सुरू झाली. पानसरे फिरायला जात त्या मार्गावरून रविवारीही मॉर्निंग वॉक काढण्यात आला.