आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फरार रुद्र पाटील मुख्य आरोपी? एसआयटीची शोधमोहीम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर/ नवी दिल्ली- कॉ. गोविंद पानसरे हत्याकांडाचा तपास करणाऱ्या यंत्रणांना सनातन संस्थेच्या रुद्र पाटील व सारंग अकोलकर ऊर्फ कुलकर्णी या दोघांच्या भूमिकेबद्दल संशय
आहे. दोघेही २००९ च्या गोवा बॉम्बस्फोटापासून फरार आहेत. रुद्र हा मुख्य आरोपी असावा, असा संशय विशेष तपास पथकाला (एसआयटी) असून त्याच्या शोधासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

दरम्यान, पानसरे यांच्या हत्याकांडातील सहभागींवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही केंद्राने दिली आहे. मडगावमध्ये १६ ऑक्टोबर २००९ रोजी स्फोट झाला होता. तेव्हापासून रुद्र व सारंग फरार आहेत. सनातन संस्थेचे गोंडा पाटील व योगेश नाईक यांनी स्कूटरमध्ये बॉम्ब आणले होते. मात्र त्यांनी घडवण्याआधीच स्फोट झाला. त्यात ते दोघेही जखमी झाले होते. नाव न सांगण्याच्या अटीवर कोल्हापुरातील पोलिस अधिकारी म्हणाला, ‘पानसरे हत्या प्रकरणात रुद्र पाटील मुख्य आरोपी असल्याचा संशय आहे. त्याचा शोध सुरू आहे३ समीर गायकवाड हा रुद्र पाटीलच्या संपर्कात होता, असे कॉल डाटा रेकॉर्डवरून स्पष्ट होते. दोघांनीही जानेवारीत पानसरेंच्या घराची रेकी केली होती. फेब्रुवारीत पानसरेंची हत्या झाली होती.’ रुद्र हा गोंडा पाटीलचा चुलतभाऊ असून सनातन संस्थेचा साधक आहे. याबाबत अधिक माहिती लवकरच एसआयटीतर्फे अधिकृतपणे दिली जाईल, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांची भूमिका संशयास्पद : कोळसे पाटील
कोल्हापूर | तब्येत उत्तम असताना कॉ. गोविंद पानसरे यांना अचानक कोल्हापूरहून मुंबईला हलवण्यासाठी दबाव टाकण्यात आला. हत्या प्रकरणी पोलिस आधीच समीर गायकवाडपर्यंत पोहोचले असताना त्यांना दुसऱ्या शक्यतांच्या आधारेही तपास करायला सांगण्यात अाले. याबाबतीत मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका संशयास्पद आहे, असा आरोप निवृत्त पोलिस अधिकारी शमशुद्दीन मुश्रीफ व माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी पत्रपरिषदेत केला.