आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलबुर्गी हत्येवेळी रुद्र पाटील व समीर गायकवाड बेळगावात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- बेळगावच्या संकेश्वर येथे कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट शिजल्यावरून महाराष्ट्र व कर्नाटक पोलिस संशयित आरोपी समीर गायकवाडची चौकशी करत आहेत. दरम्यान, कर्नाटकातील विवेकवादी एम.एस. कलबुर्गी यांच्या हत्येच्या वेळी मडगाव स्फोटातील फरार आरोपी रुद्र पाटील व समीर हे दोघे बेळगावात होते, अशी माहिती पुढे येत आहे. दोघांनी जानेवारीत कोल्हापुरात रेकी केली व फेब्रुवारीत हत्याकांड झाले. हा धागा पोलिस जुळवत आहेत.
बंदीची याचिका पडून
बंदी घालून सनातन संस्थेला दहशतवादी संघटना जाहीर करण्याच्या मागणीची याचिका मुंबई हायकोर्टात २०११ मध्येच दाखल झाली आहे. चार वर्षे ती पडून आहे.