आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पानसरेंचा खटला लढण्यास सांगलीतील ७० वकील तयार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली- कॉम्रेड गोविंद पानसरे खून खटल्यात सरकार पक्षाला मदत करण्यासाठी सांगलीतून ७० वकील तयार झाले आहेत. पानसरे यांच्या कुटुंबीयांनी याबाबत केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत फौजदारी प्रकरणे हाताळणाऱ्या दिग्गज विधिज्ञांनी या कामी एक रुपयाने न घेता पुढाकार घेतला आहे. पानसरे कुटुंबीयांच्या वतीने शनिवारी ते कोल्हापूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अाराेपपत्र दाखल करणार आहेत. या ७० वकिलांमध्ये भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांचाही समावेश आहे.

पानसरे हत्येप्रकरणी एसआयटीने अटक केलेल्या सनातन संघटनेचा कार्यकर्ता समीर गायकवाड याचा बचाव करण्यासाठी राज्यभरातून ४० वकिलांची फाैज न्यायालयात उभी राहिली हाेती. या पार्श्वभूमीवर पानसरे कुटुंबीयांनीही सरकारी पक्षाला मदत करण्यासाठी विधिज्ञांनी पुढे येण्याचे अावाहन केले हाेते. त्याला प्रतिसाद देत पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी राज्यभरातील वकिलांना वकिलपत्र घेण्याची विनंती केली. त्याला सांगलीतून मोठा प्रतिसाद मिळाला आहे.