आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समीरला काेर्टात हजर करण्याची परवानगी नाहीच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- काहीगोपनीय माहिती सांगावयाची असल्याने गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित समीर गायकवाड याला न्यायालयात हजर करण्याची परवानगी मागणारा अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांनी बुधवारी फेटाळला.

गायकवाड सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला येथील कळंबा कारागृहात ठेवण्यात आले आहे. याआधीही दोन वेळा पोलिस बंदोबस्त नसल्याने त्याला न्यायालयात हजर करता सुनावणी घेण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर याआधी झालेल्या सुनावणीवेळी गायकवाडचे वकील अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी समीरला न्यायालयात हजर राहण्याची परवानगी देण्याबाबतचा अर्ज दिला होता. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली होती, मात्र निकाल राखून ठेवण्यात आला होता. या वेळी समीरचे वकील कोर्टात हजर होते. बुधवारी न्यायालयात समीरचे वकील अॅड. समीर पटवर्धन, एम. एम. सुहासे आणि आनंद देशपांडे उपस्थित होते. सरकारी वकील म्हणून चंद्रकांत बराले काम पाहत आहेत.