आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पानसरे हत्याकांड: नार्काे, ब्रेन मॅपिंगसाठी दिले २५ लाखांचे आमिष, समीरचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- नार्को चाचणी आणि ब्रेन मॅपिंगसाठी आपल्याला २५ लाख रुपये देण्याचे आमिष पोलिस वर्दीतील एका व्यक्तीने दाखवले होते, असा धक्कादायक आरोप कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी समीर गायकवाड याने शनिवारी न्यायालयात केला.
यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.ए.यादव यांनी याबाबतची चौकशी करून डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक एस.चैतन्य यांना दिले. समीर गायकवाड म्हणाला, आॅक्टोबर रोजी न्यायालयासमोर हजर राहिलो, तेव्हा आपली मानसिक स्थिती योग्य नसल्याने न्यायालयासमोर माहिती देऊ शकलो नाही. यामुळे ही माहिती आता देत आहे. नार्को चाचणी आणि ब्रेन मॅपिंगसाठी तयारी दर्शव, तुला माफीचा साक्षीदार बनवतो आणि २५ लाख रुपये देण्यात येतील. तसे केल्यास तुला फासावर लटकवले जाईल, अशा शब्दांत पोलिस वेशातील व्यक्तीने आपणास धमकावले, असा आरोप समीरने न्यायालयासमोर केला.