आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समीर गायकवाड 21 महिन्यांनी तुरुंगाबाहेर, पानसरे हत्याप्रकरणी 25 हजारांचा जामीन मंजूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेल्हापूर - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय असलेला ‘सनातन’चा साधक समीर गायकवाड याची अखेर साेमवारी २१ महिन्यांनंतर काेल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात अाली. या हत्याकांडात समीरचा सहभाग असल्याचे ठाेस पुरावे देण्यात पाेलिस अपयश ठरल्यामुळे न्यायालयाने शनिवारी त्याला २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन अर्ज मंजूर केला हाेता. साेमवारी कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर समीरला घरी साेडण्यात अाले.   

विशेष तपास पथकाने १६ सप्टेंबर २०१५ रोजी समीरला अटक केली हाेती. पानसरे हत्या प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचा अाराेप पाेलिसांनी वारंवार न्यायालयात केला. मात्र त्याबाबत ठाेस पुरावे देण्यात त्यांना अपयश अाले. याच मुद्द्यावर समीरच्या वतीने जिल्हा व उच्च न्यायालयात दाेन वेळा जामिनासाठी अर्ज केला हाेता, मात्र तपासावर परिणाम हाेऊ नये म्हणून त्या वेळी संबंधित न्यायालयांनी त्याला जामीन देण्यास नकार दिला हाेता. मात्र २१ महिन्यांनंतरही पाेलिसांना ठाेस पुरावे देण्यात यश न अाल्यामुळे काेल्हापूर जिल्हा न्यायालयाने समीरला शनिवारी २५ हजार रुपयांचा जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. मात्र तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी अावश्यक ती कागदपत्रे समीरचे वकील शनिवारी सादर करू शकले नाहीत त्यामुळे साेमवारी ही सर्व अाैपचारिकता पूर्ण करण्यात अाली. त्यानंतर सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास समीरची कारागृहातून सुटका करण्यात अाली.  

कृष्णात दत्तात्रय येडके (वासुंबे, ता. तासगाव, जि. सांगली) व जगन्नाथ धोंडिराम पाटील (निमणे नागाव, ता. तासगाव, जि. सांगली) या दोघांच्या नावे प्रत्येकी २५ हजार रुपयांचे जामीन समीरसाठी सादर करण्यात अाले. अॅड. पटवर्धन यांनी संबंधित कागदपत्रे जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्याकडे सादर केली. त्यानंतर न्यायाधीशांनी येडके व पाटील या दाेन्ही जामीनदारांना समाेर बाेलावून त्यांची अाेळखपरेड घेतली. तसेच समीरला जामीन देण्यापूर्वी घालून दिलेल्या अटींबाबतही दाेघांना सूचना देण्यात अाल्या. या प्रक्रियेनंतर न्यायालयाने समीरला कारागृहातून साेडण्याबाबतचे अादेश कारागृह प्रशासनाला दिले. समीरच्या वतीनेही त्याचे रेशन कार्ड न्यायालयात सादर करण्यात अाले. 
बातम्या आणखी आहेत...