आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुर महानगरपालिकेचा भोंगळ कारभार : अल्पशा पावसाने रस्ते झाले जलमय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - पावसाळा येण्यापूर्वी कोणत्याही शहरातील व तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी तेथील नाले सफाई करणे हे त्यांचे आद्य कर्तव्य आहे. मात्र, कोल्हापूर महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे यंदाच्या पावसाळ्यात कोल्हापूरकरांना चांगलाच मनस्ताप सोसावा लागतो आहे. 
 
कारण पावसाळ्यापूर्वी कोल्हापूर मनपाच्या संबंधित विभागाने शहराच्या कोणत्याच भागात नालेसफाई केलेली नाही. त्यामुळे पावसाची मुसळधार सर जरी येऊन गेली तरी शहरातील काही ठिकाणचे रस्ते तात्काळ जलमय होत आहेत.
 
सध्या तर गेल्या दोन तीन दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे कोल्हापूर शहरातील स्टेशन रोडवरील शाहूपुरी पोलीस ठाण्याजवळ, व्हीनस कॉर्नर, दसरा चौकातील एम्पायर टॉवर परिसर, बुधवारपेठ, नागाळापार्क अशा ठिकाणी ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे वाहन चालवताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र तरीही कोणतीच दखल मनपा प्रशासन घेताना दिसत नाही. पालिकेच्या या भोंगळ कारभारावर कोल्हापुरातील नागरिक मात्र चांगलेच संतप्त झाले असून मनपा अधिकाऱयांना वाहनचालक शिव्यांची लाखोली वाहताना दिसत आहेत.
बातम्या आणखी आहेत...