आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी तर केवळ लखोटा घेऊन जाणारा, छत्रपतींचा सेवक!, पवारांच्या प्रतिक्रियेला मुख्यमंत्र्यांचे उत्तर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कॅप्शन- राजर्षी शाहू गाैरव ग्रंथाचे प्रकाशन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.)
कोल्हापूर- ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांचा सन्मान करण्यासाठीच युवराज संभाजीराजे छत्रपती यांची पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नियुक्ती केली. यामध्ये मी तर केवळ लखोटा नेणारा, छत्रपतींचा सेवक म्हणून भूमिका बजावली,’ अशा संयमी शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांना प्रत्युत्तर दिले. कागल (जि. काेल्हापूर) येथील शेतकरी मेळाव्यात ते बाेलत हाेते.

‘पूर्वी छत्रपती पेशव्यांची आणि पेशवे फडणवीसांची नियुक्ती करायचे. मात्र, आता फडणवीस छत्रपतींची नियुक्ती करताना पाहायला मिळाले,’ असा टाेला पवारांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांना लगावला हाेता. त्यावर फडणवीस काय बाेलतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले हाेते. पवारांच्या वक्तव्याचा संदर्भ देऊन मेळाव्यात मुख्यमंत्री म्हणाले, ‘बहुजनांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेतल्यानेच देशाचा खरा विकास होणार आहे. ज्या छत्रपतींनी देशाला विचार दिला त्या घराण्याला सन्मान दिला पाहिजे अशी आमची इच्छा होती. त्यामुळेच राष्ट्रपतींच्या यादीमधून युवराज संभाजीराजे यांना खासदार करण्याची कामगिरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पार पाडली. यामध्ये मी तर एक साधा सेवक म्हणून केवळ लखोटा देण्याची भूमिका पार पाडली,’ असे संयमी प्रत्युत्तर त्यांनी दिले मंडपात टाळ्यांचा कडकडाट झाला.
या वेळी नूतन खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
छत्रपतींचा सन्मान

काहींना बघवत नाही
‘संभाजीराजे यांची राज्यसभेवर नियुक्ती कशी झाली याची नीट माहिती वाड्यावर जेवायला गेल्यानंतर घेतली असती तर टीका करणे टाळले असते. मात्र जावळीचे मोरे, डफळे आणि बारामतीजवळच्या सुप्याचे मोहिते यांना छत्रपती घराण्याचे चांगले झालेले कधीच बघवले नव्हते.आजही काहींना छत्रपतींचा झालेला हा सन्मान बघवत नाही. अशांना ‘जाणते राजे’ तरी कसे म्हणायचे?’ -विनाेद तावडे, शिक्षणमंत्री
बातम्या आणखी आहेत...