आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी केले प्रीतिसंगमाचे शुद्धीकरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराड- राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजपच्या राज्यातील अनेक प्रमुख नेत्यांनी कराड येथील चव्हाणांच्या ‘प्रीतिसंगम’ या स्मृतिस्थळाला अभिवादन केले.  अाम्ही यशवंतरावांनी दाखवलेल्या मार्गानेच वाटचाल करत असल्याची ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली हाेती. दरम्यान,  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साेमवारी कृष्णा-काेयना या नद्यांच्या पवित्र पाण्याने ‘प्रीतिसंगमा’चे शुद्धीकरण केले. ‘आज फक्त यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची नावे घेऊन भाषणे केली जातात,  फक्त मतांसाठी त्यांचे नाव घेतले जाते; मात्र काेणताही राजकीय पक्ष चव्हाणांच्या विचाराने कृती करत नाही. या सर्वच राजकीय पक्षांच्या स्पर्शाने हे स्मृतिस्थळ अपवित्र झाले अाहे. त्यामुळे ते अाज पवित्र केले जात अाहे, अशी प्रतिक्रिया संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.     

बातम्या आणखी आहेत...