आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्‍यूदंड : अब की बार या भगिनी; देशात अजूनही महिलेला फाशी नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेणुका शिंदे आणि सीमा गावित यांना न्‍यायालयात घेऊन जाताना (फाइल फोटो) - Divya Marathi
रेणुका शिंदे आणि सीमा गावित यांना न्‍यायालयात घेऊन जाताना (फाइल फोटो)
कोल्‍हापूर – याकूब मेमनला फाशी झाली. त्‍यानंतर राज्‍यात पुढची फाशी कोल्‍हापुरातील दोन भगिनींना होण्‍याची शक्‍यता आहे. रेणुका शिंदे आणि सीमा गावित अशी त्‍यांची नावे आहेत. त्‍यांनी 13 मुलांचे अपहरण करून त्‍यातील नऊ मुलांची हत्‍या केल्‍याचे सिद्ध झाले. त्‍यामुळे त्‍यांना मृत्‍यूदंड ठोठावण्‍यात आला. राष्‍ट्रपतींनी त्‍यांची दया याचिका फेटाळून लावली आहे. दरम्‍यान, मृत्‍यूदंडाची शिक्षा ही जन्‍मठेपेत बदलावी, यासाठी त्‍यांची याचिका उच्‍च न्‍यायालयात प्रलंबित आहे. न्‍यायालयाने ही याचिका फेटाळली तर लवकरच या दोन बहिणींना फाशी होईल. देश स्‍वातंत्र्यानंतर आतापर्यंत एकाही महिला गुन्‍हेगाराला मृत्‍यूदंड दिला गेला नाही. त्‍यामुळे यांना जर मृत्‍यूदंड दिला तर हा देशातील महिलांचा पहिला मृत्‍यदंड ठरणार आहे. मात्र, कोणत्‍या कारणासाठी या महिलांना फाशी दिली गेली याची माहिती खास divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी....
नेमके काय आहे प्रकरण
सैतानालाही लाजवेल अशा या क्रुर हत्‍याकांडाची मुख्‍य सूत्रधार रेणुका आणि सीमा यांची आई अंजनाबाई गावित ही होती. स्वतः आई असलेली ही स्त्री आणि तिच्या दोन मुलीच्‍या मदतीने इतरांच्या बालकांना पळवून नेत होत्‍या. त्‍यानंतर दमदाटी करून किंवा निरागस मुलांकडून भीक मागून घेतले जात होते. एखद्या मुलाने जर या बाबत कुणाला काही सांगितले तर त्‍याला ठार मारले जात होते. अशा प्रकारे त्‍यांनी 42 मुलांना ठार केल्‍याचा आरोप होता. पोलिसांकडे त्‍याची त्‍यांनी कबुलीही दिली. पण, 42 पैकी 9 हत्‍या झाल्‍याचे न्‍यायालयात सिद्ध झाले. 29 ऑक्‍टोबर 1996 रोजी हे बालहत्याकांड उघडकीस आले. यामुळे सारा महाराष्ट्र हादरला होता. सुरवातीला अंजनाबाई एकटीच मुलांना पळवीत असे. नंतर तिने दोन्ही मुलींना त्यात सामील करून घेतले. 1990 च्या सुमारास त्यांनी मुलांना पळवण्यास सुरुवात केली. चोरी, पाकीटमारी करण्यासाठी एक ते तेरा वर्षांपर्यंतच्या बालकांना पळवून त्यांचा खून केल्याचे हे प्रकरण आहे. वर्ष 1997 मध्‍ये अंजनाबाईचा मृत्‍यू झाला. त्‍यामुळे आता रेणुका आणि सीमाच उरल्‍या आहेत.
फॅक्ट फाईल-
- 1990 ते 1996 या काळात रेणुका, तिचा पती किरण शिंदे, बहीण सीमा आणि आई अंजनाबाई गावित यांनी 13 लहान मुलांचे अपहरण केले होते. त्यातील नऊ मुलांचा निर्घृण खून करण्यात आला होता.
- आई अंजनाबाईचा 1997 मध्ये मृत्यू झाला. किरण शिंदे हा या खटल्यात माफीचा साक्षीदार झाला होता. दयेचा अर्ज फेटाळल्यामुळे दोन्ही बहिणींच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झाले आहे.
- अंजनाबाईचा 17 डिसेंबर 1997 रोजी कारागृहात मृत्यू झाला, त्यामुळे रेणुका व सीमा यांच्यावर खटला चालविण्यात आला. तेरा बालकांचे अपहरण करून खून केल्याचा आरोप पोलिसांनी त्यांच्यावर ठेवला.
- 28 जून 2001 रोजी कोल्हापूरमधील सेशन कोर्टाने या दोघींना नऊ मुलांचा खून केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली. रेणुका व सीमाने याला हायकोर्टात आव्हान दिले.
- हायकोर्टाने 8 सप्टेंबर 2004 रोजी सेशन कोर्टाचा फाशीच्या शिक्षेचा निर्णय कायम ठेवला. या निर्णयाला या बहिणींनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.
- सुप्रीम कोर्टानेही 31 ऑगस्ट 2006 रोजी त्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली.
- फाशीची शिक्षा माफ करावी यासाठी त्यांनी केलेला दयेचा अर्ज दाखल, जुलै 2014 मध्ये राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्याने त्यांच्या फाशीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
न्‍यायालयात निर्णयाकडे लक्ष
आपल्‍या मृत्‍यूदंडाची शिक्षा जन्‍मठेपेत बदलावी, यसाठी या दोघींनीही मुंबई उच्‍च न्‍यायालयात याचिका न्‍यायाधीश व्‍ही. एम कानाडे आणि पी. डी. कोडे यांच्‍या बेंचने मंजूर केली. त्‍यावर आता काय निर्णय होते यावर या भगिनींचा मृत्‍यूदंड ठरणार आहे. या प्रकरणी 24 नोंव्‍हेबर 2015 पुढची सुनावणी होणार आहे. कोल्हापूरच्‍या जिल्‍हा सत्र न्‍यायालयाने 2001 या दोघींना फाशीची शिक्षा ठोठावली होती. सर्वोच्‍च न्‍यायालयो वर्ष 2006 मध्‍ये ती कायम ठेवली. राष्‍ट्रपतींनीही 2014 मध्‍ये त्‍यांच्‍या दयेचा अर्ज फेटाळला.
पुढील स्लाइडवर संबंधित फोटोज...