आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nilam Gorhe News In Marathi, Shiv Sena, Congress, Divya Marathi

आघाडीचे जहाज लवकरच बुडेल, आमदार नीलम गो-हे यांचा साता-यात दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - विधानसभेसाठी मुख्यमंत्री ज्या जहाजाचे नेतृत्त्व करत आहेत त्या गलबतातली मंडळी पळून जात आहेत. लवकरच आघाडीचे हे जहाज बुडणार आहे. काही पक्षांना आपल्या पक्षातच बंडखोर तयार करावे लागतात आणि त्यांना निवडून आणून मंत्री करावे लागते, अशी टीका शिवसेना नेत्या नीलम गो-हे यांनी राष्‍ट्रवादी व काँग्रेसवर सोमवारी येथे केली. शिवसेना पक्षप्रमुख जे बोलतात तेच करतात. त्यामुळे बंडखोरीला आमच्या पक्षात थारा नाही, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

गो-हे म्हणाल्या, शिवसेनेत बंडखोरीला थारा नाही आणि तसा प्रयत्न केला तर राहुल नार्वेकरसारखी अवस्था होते हे उदाहरणही शिवसैनिकांपुढे आहे. सिंचनाच्या प्रश्नावर आघाडी सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. पश्चिम महाराष्‍ट्रातील अनेक योजना पूर्ण झाल्या नाहीत. आघाडी सरकारकडे सत्ता आली. मात्र, त्यापूर्वी आम्ही जे काम केले होते त्यापुढे काहीच काम झालेले नाही. आम्ही आखलेल्या योजना 1999 नंतर तशाच पडून राहिल्या. त्याला आघाडी सरकार जबाबदार आहे. आता सिंचन घोटाळ्यासह अनेक मुद्द्यांवर आघाडीचे हे जहाज मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली बुडायला आले आहे.जनता ते नक्की बुडवेल, असेही त्या म्हणाल्या.

जागा वाटपाचा प्रश्न समन्वय समितीत सुटेल. हा मुद्दा गंभीर नसून महायुतीचे नेते चर्चेने हा प्रश्न सोडवतील. भाजपने जागा वाढवून मागितल्या असल्या तरी चर्चेतून नक्कीच मार्ग निघेल, असेही त्या म्हणाल्या.