आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवेदिता मानेंचा मुलगा भाजपच्या वाटेवर !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा, माजी खासदार निवेदिता माने यांचा धाकटा मुलगा सत्त्वशील भाजपच्या वाटेवर आहे. प्रवेशाबाबत भाजपच्या नेत्यांशी चर्चा झाली असून लवकरच प्रवेशही होईल, असे खुद्द सत्त्वशील यांनीच पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सत्त्वशील हे निवेदिता माने यांचे धाकटे चिरंजीव असून त्यांचा येथून जवळच असणार्‍या फाइव्ह स्टार एमआयडीसीत उद्योग आहे. त्यांचे ज्येष्ठ बंधू धैर्यशील हे जिल्हा परिषदेत कार्यरत आहेत. लोकसभेसाठीची हातकणंगले मतदारसंघाची माने यांची जागा कॉँग्रेसला देताना निवेदिता माने यांना विधान परिषदेवर संधी देण्याचा शब्द देण्यात आला होता. तो पाळला न गेल्याने आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सत्त्वशील यांनी सांगितले. त्यांच्या पक्षत्यागाला घरच्या मंडळींचा पाठिंबा नसला तरी आपली ‘एकला चलो रे’ची भूमिका असल्याचे सत्त्वशील यांनी सांगितले. माने यांनी पुढच्या महिन्यात ‘रॉकस्टार मिकासिंग’ याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यासंबंधी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप प्रवेशाची माहिती दिली.

(फोटो - संग्रहित छायाचित्र)